YouTube

Wednesday 18 March 2020

उपवासाची बटाट्याची भाजी


साहित्य
३-४ मध्यम आकाराचे बटाटे३ टेबलस्पून दाण्याचा कुट२ टेबलस्पून ओलं खोबरं १  टीस्पून जिरे२-३ हिरव्या मिरच्या१ टीस्पून साखर१ टेबलस्पून कोथिंबीर२ टेबलस्पून तूपमीठ चवीप्रमाणे

कृती
बटाटे कुकरमध्ये उकडून त्याची साले काढा आणि बारीक फोडी करा.साधारण १/२" x १/२" च्या चौकोनी फोडी करा.बटाट्याच्या फोडींना मीठ साखर दाण्याचा कुट चोळून ठेवा.कढईत  तूप कडकडीत गरम करा आणि जिरे आणि हिरवी मिरची फोडणीला घाला.  लगेच बटाट्याच्या फोडी घालून परता.ओलं खोबरं कोथिंबीर घालून १ वाफ आणा आणि सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...