YouTube

Friday 8 November 2019

बटाट्याचा शिरा

बटाट्याचा शिरा उपवासासाठी चालतो तसेच लहान मुलांसाठी शक्तिवर्धक असतो म्हणून तुम्ही कधीही बनवू शकता . आजच्या ब्लोग मध्ये आपले स्वागत आहे व ज्यांना गोड खायला आवडतं त्यांच्या साठी एकदम सोपा घरगुती शिरा कसा बनवायचा याची कृती दिली आहे . कृपया ब्लोग पूर्ण वाचा परंतु त्या आधी हि पाककृती सगळ्यांसोबत शेयर करा .

Image result for बटाटा शिरा
Image Credit: BetterButter

साहित्य:
चांगले बटाटे - आर्धा किलो
तूप - आपल्या सवयीनुसार जास्तही चालेल पण कमीत कमी ४ टेबल स्पून
वेलदोडे पूड
केशर - ३-४ पाकळ्या छोट्या वाटीत पाण्यात भिजवून ठेवलेली किंवा केशरी खाण्याचा रंग
साखर - चवीनुसार जास्त हि चालेल पण कमीत कमी २०० ग्राम
काजू - तुकडे करून ठेवलेले
बदाम - तुकडे करून ठेवलेले
किशमिश
अन्य सुका मेवा आपल्या सोयीनुसार

कृती:
बटाटे चांगले धुवून घ्या आणि चिरून दोन तुकडे करून  चेक करून घ्या चांगले आहेत कि सडलेले . सडलेले फेकून द्या .
सर्व चांगले बटाटे कुकर मध्ये उकडून घ्या . बटाटे चांगले थंड होवू द्या . त्यानंतर साल काढून बटाटे पुरण यंत्रातून काढून घ्या .
कढाई मध्ये तूप घ्या आणि बटाट्याचा लगदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या . मधून मधून ग्यास कमी जास्त करत रहा म्हणजे बटाटा कढाईला चीटकणार नाही .
आता या लगद्यात साखर, वेलदोडे पूड घालून परत एकदा साखर व्यवास्थित मिळेपर्यंत हलवत रहा .
जर तुम्ही ख्याण्याचा रंग वापरणार असाल तर तो रंग हि एक थेंब (लिक्विड कलर) किंवा एक चिमुट भर (powder कलर) पाण्यात मिसळून टाकून द्या .
साखर मिसळली कि ग्यास बंद करा .
जर तुम्ही रंग येण्यासाठी केशर वापरणार असाल तर गरम गरम शि-यामध्ये पाण्यात भिजवलेली केशर टाका आणि एकदा चांगल मिसळून घ्या .
काजू, बदाम, किशमिश व अन्य सुका मेवा वाढताना सजवून द्या .

टीप : १) पुरण यंत्र नसेल तर पावभाजी masher ने बटाट्याचा लगदा तयार करा . masher ऐवजी तुम्ही जाड किसणी देखील वापरू शकता .
२) केशर पाण्यात भिजवून ठेवल्यास चांगला रंग येतो . पण बिलकुल कमीत कमी पाण्यात केशर भिजवावी .

धन्यवाद . शेयर करा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...