YouTube

Friday, 22 November 2019

व-याचे तांदूळ - दाण्याची आमटी

वरईचे तांदूळ म्हणजेच भगर उपवासाच्या दिवशी सहज आणि पटकन बनवण्यात येणारा पदार्थ. तसं दह्यासोबत भगर खायला चविष्ट लागते पण कधी  कधी  अस वाटते न कि काहीतरी गरम गरम सोबत असल तर उत्तम तर त्याच साठी आज भगर आणि उपवासाची आमटी कशी करायची याची रेसिपी शेयर करत आहे.
पण त्या आधी कृपया हा ब्लोग शेयर करा आणि subscribe देखील करा.

Image result for भगर
Image Credit: Jyoti Dehliwal

साहित्य:

भगर/ वरइचा भात 
१ कप वरईचे तांदूळ म्हणजेच भगर
साजूक तूप
जिरे
शेंदे मीठ - चवीनुसार
हिरव्या मिरच्या - सोयीनुसार चिरलेल्या २ -३
दही - अर्धा कप
शेंगदाणे कुत - कमीत कमी 2 टेबल स्पून अथवा आवडीनुसार
कोथिंबीर चिरलेली
कढीपत्ता - उपवासाला चालत असेल तर ८-१० पान
ब-याच ठिकाणी टमाटे, गाजर उपवासाला चालतात - ज्यांना चालतात त्यांनी बारीक चिरलेले टमाटे १-२, १ गाजर मोठ्या खिसणीने खिसून घेतले तरी चालेल.

आमटी:
शेकून टरफल काढलेले १ कप शेंगदाणे
१ मोठा बटाटा उकडलेला - चिरलेला
जिरे
शेंदे मीठ - चवीनुसार
लाल तिखट - चवीनुसार
साजूक तूप
हिरवी मिरची सोयीनुसार चिरलेली - ३-४
आलं - थोडं वाटलेले
आंबट ताक किंवा चिंचेचा कोळ
गुळ
टमाटे - उपवासाला तुमच्या कडे चालत असतील तर १-२ बारीक चिरून
कढीपत्ता - उपवासाला तुमच्या कडे चालत असतील तर ५-६ 

कृती 

भगर/ वरइचा भात 

१ कप वरईचे तांदूळ म्हणजेच भगर व्यवस्थित धुवून घ्यावी.
एका कढाईत किंवा कुकरच्या pan मध्ये साजूक तूप कमीत कमी १ टी स्पून टाकून गरम करून घ्या. 
मग जिरे टाकून तडतडू द्या. 
त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाका. 
जर टमाटे आणि गाजर चालत असतीन तर चिरलेले टमाटे आणि खिसलेली गाजर टाकून एकदा परतून घ्या.
आता १ कप वरईचे तांदूळ म्हणजेच भगर त्याचात टाकून थोडी परतून घ्या.
जवळपास दीड ते दोन कप पाणी टाकून शेंदे मीठ, दाण्याचे कुट, दही टाकून शिजवून घ्या. 
हि झाली तुमची भगर तयार. 

आमटी:
शेकून टरफल काढलेले १ कप शेंगदाणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
कढाईत साजूक तूप गरम करून जिरे टाका व तडतडू द्या.
हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं टाकून परतून घ्या.
बारीक चिरून ठेवलेले टमाटे (उपवासाला तुमच्या कडे चालत असतील तर) टाकून पारून घ्या.
बारीक बाटलेले शेंगदाणे टाका आणि थोडं परतून घ्या.
उकडून चिरलेला बटाटा,  शेंदे मीठ, लाल तिखट, आंबट ताक किंवा चिंचेचा कोळ, गुळ आणि पाणी टाकून सगळं एकत्र करा आणि उकळू द्या.

गरम गरम वाढताना कोथिंबीर आणि साजूक तूप टाका.

आपल्याला हि रेसिपी कशी वाटली comment करून सांगा. धन्यवाद. शेयर करा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...