YouTube

Thursday 17 October 2019

केशरी लवंगलता

लवंगलता हि गोड असते आणि आता दिवाळीच्या सणात सगळ्यांना खाऊ घालण्यात काही औरच मजा आहे . चला तर जाणून घेवूया या केशरी लवंगलता बनवतात कश्या ? ही मिठाई पूर्ण भारत भर सगळीकडेच खाण्यात येतात .

Image result for लवंगलता
Image Credit: जनता से रिश्ता


साहित्य:
मैदा - दीड कप
तूप - तळण्यासाठी
केशरी रंगाचं पाणी किंवा कोमट पाण्यात भिजवून ठेवलेली केशर ७-८ पाकळ्या
दुध
लवंगा - शेवटी टोचण्यासाठी .

सारणाच साहित्य: 
खवा - एक कप किंवा २०० ग्राम
पिठी साखर - कमीत कमी पाव कप
३ - ४ वेलदोडे ची पूड
२ - ३ लवंगांची पूड
बारीक चिरलेले काजू, बदाम, अन्य सुख मेवा आणि किशमिश

पाकाचे साहित्य:
दीड कप साखर
एक कप पाणी

कृती 
सर्वात आधी मैदा चाळून घ्या . केशरी रंगाच पाणी किंवा केशर टाकलेलं पाणी घेवून मैदा घट्टसर भिजवून ठेवा .
कमीत कमी अर्धा तास भिजू द्या

सारण बनवण्यासाठी कढाई मध्ये थोडं तूप टाकून खवा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्या . त्यानंतर ग्यास बंद करून पिठी साखर वेलदोडे पूड आणि लवंग पूड टाकून एकदा एकत्र करा त्यासोबतच बारीक केलेला सुका मेवा मिसळा .

पाक तयार करण्यासाठी पाणी आणि साखर एकत्र करून उकळून घ्या.

लवंगलता करण्यासाठी मैद्याच्या पोळ्या लाटून घ्या . मधोमध दुधाचा हात लावून सारण ठेवा म्हणजे ते चिकटेल . दिंडी बनवतो तसा आकार दुध लावून बनवा . मंद ग्यास वर तुपात तळून पाकात टाका. पाच मिनिटांनी पाकातून काढा . आता लवंग टोचा - झाल्या लवंगलता तयार .

हि पाककृती सगळ्या खवैया सोबत शेयर करा व या ब्लोग चे अन्य articles वाचा .

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...