उपवास खास करून एकादशी किंवा शिवरात्री म्हंटल कि निरनिराळे उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी मिळतात . काही न काही नवीन केलं म्हणजे उपवासाची मजा . आज अश्याच खवय्ये मित्र आणि मैत्रिणींसाठी उपवासाची भजी कशी करावीत याची कृती शेयर करत आहे .
image credit : Times of India
साहित्य:
३-४ बटाटे - साल काढून पातळ चकत्या करून पाण्यात भिजवून ठेवलेली .
शिंगाडा पीठ
जिरेपूड
तिखट - चवीनुसार
शेंदे मीठ - चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरलेली
शेंगदाणा तेल - भजी तळण्यासाठी
कृती:
शिंगाडे पिठात जीरेपूर, तिखट, शेंदे मीठ आणि कोथिंबीर टाकून पाणी टाकून चांगलं घोटून घोटून भज्याच मिश्रण तयार करा. घोटून मिश्रण तयार केलं तर गाठ्या राहत नाही आणि भजी कुरकुरीत होतात .
कढईत तेल टाकून तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले का हे बघण्यासाठी एक छोटासा थेंब भज्याच्या मिश्रणाचा टाकून बघा . पीठ टाकताच तेलाच्या वर आल की समजा झाले तेल गरम .
आता बटाट्याच्या चकत्या पानाय्तून काढून कापडाने पुसून भज्याच्या मिश्रणात बुडवून भजी तळा .
हि भजी दह्यासोबत खाऊ शकता .
हि पाककृती आपल्यास कशी वाटली comment करून सांगा व शेयर करायला विसरू नका .
धन्यवाद

No comments:
Post a Comment