साहित्य
साबूदाणा - 1 कप बटाटा - 2 (उकडलेले ) शेंगदाणे - 1 टेस्पून ( भाजून ठेचून बारीक केलेले) तूप - 2 चमचे आले - 1 चमचा ( किसलेले ) हिरवी मिरची - 2 ( बारीक चिरून ) जिरे - 1/2 टिस्पून मिरपूड - 1/4 चमचा (बारीक केलेले ) मीठ - स्वादानुसार
कृती
एका भांड्यामध्ये साबुदाणा टाकून त्यात २ ते ३ कप पाणी टाका व ४ ते ५ तासाकरिता बाजूला ठेवा . जेणेकरून साबुदाणा चांगल्या पद्धतीने मुरेल . आता त्यातले सर्व पाणी काढून घ्या.एका भांड्यात बटाटे सोलून बोटांच्या मदतीने कुच्करीत टाका . आता त्यात मुरलेला साबुदाणा , शेंगदाणे , आले, हिरवी मिरची, जिरे , मिरेपूड आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या . व घट्ट असा गोळा तयार करा .तवा ग्यासवर थोडा गरम करायला ठेवा , थोडे तेल हाताला लावा , व व कोरपाटावरती प्लास्टिक पेपर त्याला सुद्धा थोडे तेल लावा . आता तयार गोळ्याचा एक तुकडा घ्या व प्लास्टिक पेपर वरती बोटांच्या मदतीने पोळी तयार करा . व मध्ये एक छिद्र पाडा जेणेकरून तुम्हाला त्यात तेल टाकता येईल .आता तवा गरम झाला असल्यास तयार पोळी त्यावर टाका मध्ये आणि भोवताली थोडे तेल सोडा व हलका तपकिरी रंग होईपर्यंत भाजू द्या . नंतर पोळी ला पलटून थोडे तेल टाकून भाजू द्या .तुमचे गरमा गरम साबुदाणा थालीपीठ तयार आहेत , तुम्ही हे दह्यासोबत सर्व करू शकता .
No comments:
Post a Comment