बटाटे - 2 मोठे, उकडून आवश्क्ते नुसार कुस्करूनतेल - २ टे. स्पून मोहरी - १/२ चमचेजिरे - १/२ चमचेहिरव्या मिरच्या - 2 , बारीक चिरलेलाकढीपत्त्याची पाने - 5-6हळद - ¼ चमचेआद्रक लसुन ची पेस्ट - १/२ चमचेहिंग - चिमूटभरकांदा - १ - २ चिरलेलीमीठ - चवीनुसारसाखर - एक चिमूटभर कोथिंबीर - बारीक चिरलेला
कृती
एका भांड्यात बटाटे उकडून घ्या . व उकडल्यानंतर त्याची साल काढून तो आवश्क्तेनुसार कुस्करून घ्या .एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या . त्यात जिरे, मोहरी टाकून तडकू द्या . आद्रक लसुन ची पेस्ट टाका .नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पाने घालून परतून घ्या .लगेच चिरलेला कांदा टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत परता . त्यात हळद आणि हिंग घालून त्यात, थोडे मीठ घाला.नंतर तयार झालेल्या फोडणीत कुस्करलेले बटाटे घाला आणि मिक्स करून घ्या . शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला व सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment