YouTube

Monday 12 October 2015

आयुष्याला द्यावे उत्तर..


ही कविता अशीच सोशल मीडिया वर सापडली खुप छान वाटली कुणी लिहिली हे महित नाही पण ज्याणीपण लिहिली सुरेख आहे


असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती, 
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, 
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे, 
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही, 
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास  सा-या, 
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही, 
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर...


        किमान दोनदा वाचा

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...