एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून प्रवास करीत होते. बराच प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधूनउतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु झाली.
आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड
पडला, आणि त्याने बसमधील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून उतरलेल्या प्रवासी जोडप्याने म्हटले, "अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे झाले असते."
तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले असेल?
उत्तर आहे. जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर त्याना जो उतरण्यासाठी वेळ लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती. म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती. ती काही अंतर पुढे गेलेली असती आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच नसता.
याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर रहा. जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून, हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)
विजेता कधीच पळून जात नाही आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा, झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा
================================================================
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
==========================================================
No comments:
Post a Comment