YouTube

Tuesday, 23 December 2014

केळीच्या पानावर जेवण का.. ?

हिंदू धर्म ग्रंथा मध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणा मुळे या झाडाची पूजा केली जाते. काही विशेष पूजन कर्मा मध्ये या झाडाच्या पानांचा मंडप ही तयार केला जातो. हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होता आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते.... वास्तु नुसार केळीचे झाड घराच्या समोर किंवा बागे मध्ये लावणे शुभ मानले जाते......

भारतातील काही भागां मध्ये या झाडाच्या पवित्र ते मुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे. आज आम्ही तुम्हाला केळीच्या पानांवर जेवण केल्याने कोण कोणते फायदे होतात या संदर्भात माहिती देत आहोत......

१]केळीच्या पानां मधून मिळणारे फायबर चटई, जाड पेपर, पेपर पल्प बनवण्या साठी उपयोगात आणले जाते. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरा साठी चांगले असतात.....

२]केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.…

३]केळीच्या पाना मध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळा पर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.……

४]त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.……

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...