मी नाही म्हणत....
तू फक्त माझ असाव... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्या खेरीज कुणी नसाव...
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं.. पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात रहाव..
मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवाव... पण माझ्या मनी मात्र तूच वसाव...
मी नाही म्हणत....
तू माझ्या साठी रडावं....पण माझी पापणी मात्र तुझ्याच साठी भिजाव..
मी नाही म्हणत....
तू मला प्रेम कराव... पण कधी तरी तुलाही माझ्याच सारखा प्रेम व्हाव...
मी नाही म्हणत....
तू कधी हसू नये.... पण माझ्या साठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं
मी नाही म्हणत....
तू मला भेटाव.. पण माझ्या साठी ती भेट मला सुखी करून जाव...
मी नाही म्हणत....
कधी तू माझ्या साठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी....
मी नाही म्हणत....
कधी तुला मीच दिसव.... पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखाताव...
मी नाही म्हणत....
कधी तुझी भावना तुझ्यापासन दूर जावी.. पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली....
मी नाही म्हणत....
माझ्या भावनान सोबत खेळू नको... पण माझ तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस...
मी एवढच म्हणते....
माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मी तरी तु माझा अन मी तुझी बनून यावी.
No comments:
Post a Comment